आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये झी मराठीच्या “जय मल्हार” या मालिकेचा समावेश होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा वर आधारित ही मालिका 18 मे 2014 रोजी सुरू झाली होती. या मालिकेत देवदत्त नागे यांनी खंडोबाची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. सुरभी हांडे हिने म्हाळसा देवीची भूमिका साकारली होती. आज आपण म्हाळसा देवीची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडे बद्दल थोड जाणून घेऊयात.

Surabhi hande latest


सुरभीचा 20 मे 1991 ला भंडारा येथे झाला होता व नंतर तिचे बालपण जळगाव या शहरात गेले होते. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण तीने जळगाव येथेच पूर्ण केले. नंतर तीने पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेली. सुरभी अवघ्या 16 वर्षाची असताना “स्वामी” या नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. नंतर तिने स्टँड बाय या हिंदी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.

खरे तर तिला अभिनय क्षेत्रात खरे यश जय मल्हार या लोकप्रिय मालिकेतून मिळाले होते. म्हाळसा देवीच्या भूमिकेला तीने योग्य न्याय दिला, असेच म्हणता येईल. त्याच कारणाने सुरभीला “अगबाई अरेच्चा 2 या चित्रपटात संधी भेटली.त्यानंतर स्टार प्रवाहच्या “आंबट गोड” या मालिकेतून देखील ती दिसून आली. तसेच “लक्ष्मी सदैव मंगलम” या मालिकेत देखील सुरभीने उत्तम अभिनय केला होता.

सध्या सुरभीचे एक गाणे गातानाचे काही व्हिडिओज व्हायरल होताना दिसून येत आहेत. आपल्या सुरेल आवाजात सुरभीने “ये राते ये मौसम” व “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या” ही गाणी उत्तम रित्या गायलेले गाण्याच्या व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसून येत आहेत. सध्या सुरभी परत एकदा सोशल मीडियावर ॲक्टिव झाली असून नेहमी काहीतरी पोस्ट करताना दिसून येत आहे.

तुम्हाला सुरभीला कोणत्या लुक मध्ये जास्त पाहायला आवडेल ते कमेंट करून कळवा वे शेयर करायला विसरु नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *