देशभरात सर्वत्र कोरोना ने परत एकदा हाहाकार माजविला आहे. विशेष करून महाराष्ट्रात या महामारीने थैमान घालून ठेवले आहे. सामान्य जनतेसह आता अभिनय क्षेत्रातील कलाकारांना देखील कोरोनाची लागण होताना दिसून येत आहे. सोनी सब वाहिनीवरील कलाकारांना सध्या कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे.

Tarak mehta team corona positive

S

सोनी सब वाहिनीवरील सर्व मालिका या कौटुंबिक मालिका असतात व लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच या वाहिनीवरील मालिकांचा आस्वाद घेत असतात. यामुळेच तारक मेहता का उलटा चष्मा सारखी मालिका गेल्या 13 वर्षापासून यशस्वीरीत्या चालू आहे. परंतु, आता सोनी सब वाहिनीवरील वागले की दुनिया मालिकेतील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे “अमर उजाला”ने सांगितले.

 

वागले की दुनिया मधील मुख्य कलाकार सुमित राघवन, भारती आचरेकर, परिवा प्रणती, तसेच बाल कलाकार चिन्मयी साळवी शीहान कपाही यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच, इतर कर्मचारी वर्ग धरून सेटवरील एकूण 14 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 8 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू झालेल्या या नवीन मालिकेची शुटींग थांबविण्यात आली असल्याचे समजते.

 

सोनी सब वाहिनीवरील तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील मंदार चांदवडकर(भिडे) व मयूर वकानी (सुंदरलाल) या दोघांना पण कोरोनाची लागण झाली होती. परंतु, यामुळे मालिकेच्या शुटींग वर काही परिणाम झाला नव्हता. आता दोघेही लवकरच मालिकेत दिसणार असल्याचे समजते. परंतु, वागले की दुनिया मालिकेची शुटींग किती दिवस बंद राहणार हे येणारा काळच सांगेल.

Tarak mehta team corona

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *