Top five marathi serial 2021

मराठी मालिकांच्या टीआरपी मध्ये नेहमीच चढ उतार झालेला पाहायला मिळत असतो. टीआरपी वाढवण्यासाठी मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही बदल केलेले पाहायला मिळतात. इतके दिवस मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळत होती, मात्र या वर्षी चक्क वेगवेगळ्या चॅनेलच्या पुरस्कार सोहळ्या मध्ये चढाओढ पाहायला मिळाली.


दरवर्षी दिवाळीच्या वेळी किंव्हा वर्षाच्या शेवटी सर्व पुरस्कार सोहळ्याची नांदी झालेली दिसून येते. परंतु या वर्षी कोरोना कारणास्तव मराठी चॅनेलचे पुरस्कार सोहळे मार्च एप्रिल मध्ये पाहायला मिळाले. स्टार प्रवाह झी मराठी कलर्स मराठी या तिन्ही चॅनेल ने एका पाठोपाठ एक आयोजिले होते. कलर्स मराठी 21 मार्च, झी मराठी 28 मार्च व स्टार प्रवाह 4 एप्रिल रोजी प्रसारित करण्याचे ठरले होते.

परंतु, नंतर झी मराठी ने अवार्ड सोहळ्याचे प्रक्षेपण 2 भागात करण्याचे ठरवले व त्यामुळे 4 एप्रिल रोजी झी मराठी व स्टार प्रवाह वाहिनीचे पुरस्कार सोहळे एकाच दिवशी प्रसारित झाले. प्रसारक प्रेक्षक संशोधन परिषदेने(BARC) या वर्षाच्या 14व्या आठवड्यातील टीआरपीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीत मालिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

 

BARC ने जाहीर केलेल्या आकेडवरीत स्टार प्रवाह वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याने पहिला क्रमांक पटकाविला आहे. झी मराठीच्या मालिका व सोहळ्याने या यादीत टॉप 5 मध्ये जागा मिळवू शकले नाहीत. फुलाला सुगंध मातीचा ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर, मुलगी झाली हो तिसऱ्या क्रमांकावर, सुख म्हणजे नक्की काय असतं चौथ्या क्रमांकावर, तर रंग माझा वेगळा ही मालिका 5व्या क्रमांकावर आहे.

Top five marathi serial 2021
Credit:BARC INDIA

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *