सोशल मीडियावर एखादा ट्रेंड चालू राहिला तर त्याला लाखो लोग करताना फॉलो करताना दिसून येत असतात. गेल्या वर्षभरात तर किती तरी ट्रेंड ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला दिसून येत होता. सध्या एक लोकप्रिय गाणे “बारिश की जाये” वर देखील डान्स व्हिडिओ बनविण्याचा ट्रेंड चालू आहेत. त्यातच करमाळ्याच्या एका व्यक्तीने देखील यावर व्हिडिओ बनविला आहे.

Vikram Alhat viral video


बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी चित्रित व बी प्राक याने गायलेले “बारिश की जाये” हे गाणे देशभरात व्हायरल झाले. सोलापूरच्या करमाळा गावातील विक्रम अल्हाट या 34 वर्षीय व्यक्तीने याच गाण्यावर डान्स व्हिडिओ करून लोकप्रियता मिळविली. अनेक जण या गाण्याला जोडीने डान्स करताना दिसतात. परंतु, विक्रम यांनी एकटेच हटके रुपात डान्स करून अनेकांची मने जिंकली.

Vinod

विक्रम अल्हाट करमाळा शहरातील एका प्रकृती बाल रुग्णालयात जॉब करतात. परंतु जॉब मधून वेळ मिळत नसल्याने अनेक वेळा त्यांना अभिनया पासून दूर राहावे लागते. व्हिडिओ बनविणे हा त्यांचा छंद नसून ये “बारिश की जाये” या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यांची कुर्ता व धोतर वर व्हिडिओ बनविण्याची युक्ती लोकांना खूपच आवडली.

 

विक्रम यांना खरी लोकप्रियता टिक टॉकच्या माध्यमातून मिळाली होती. आता एका डान्स व्हिडिओ मुळे ते परत एकदा लोकप्रिय झाले आहेत. अभिनय क्षेत्रात पुढे चालून संधी भेटल्यास ते नक्की काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले. सोशल मीडियावर एखाद्याला रातोरात स्टार बनविले जाते, याचा प्रत्यय परत एकदा विक्रम यांच्यामुळे आला.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *