सध्याच्या आधुनिक युगात कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नसतो. काही व्हिडिओ संपूर्ण माहिती सहित व्हायरल होत असतात तर काही व्हिडिओ मागील सत्य माहिती नसताना देखील नेटकरी चुकीचा अर्थ काढून शेयर करीत असतात.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ एका हेयर कटिंग सलून मधील असून तो व्यक्ती कटिंग करीत करीतच गाणे ऐकून रडू लागतो. “सब कूछ भुला दिया” या दुःखी गाण्यावर तो रडलेले पाहून अनेकांनी त्याला प्रेमात धोका मिळालेला आशिक असल्याचे म्हटले.
वरील व्हिडिओ मागचे खरे सत्य आता समोर आले आहे. या व्हिडिओ मध्ये दिसणारा व्यक्ती हा प्रेमी नसून तो एक वेडसर असल्याचे समजते. या व्यक्तीचे नाव अवधेश कुमार असून तो दिल्लीच्या मोहन गार्डन परिसरात राहत्या घरी दारूच्या नशेत पायऱ्या वरून पडला होता. त्याच्यावर उपचार चालू असतानाच तो घर सोडून पळून गेला होता.
अवधेश हा 45 वर्षाचा असून त्याच्या हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला एक पत्नी व मुलगा आहे. जेंव्हा हा व्हिडिओ अवधेश यांच्या घरापर्यंत पोहचला तेंव्हा त्यांनी परत हा व्हिडिओ कुठला आहे हा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कोणालाही याबद्दल माहिती मिळाल्यास 7678533286 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
ही माहिती जास्तीत जास्त शेयर करा व तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.