गेल्या वर्षभरात जगभरात कोरोना मुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला. भारतात देखील सर्वत्र मृत्यूचे तांडव उभे राहिले असून दुर्दैवाने त्यात अनेक कलाकारांचा देखील समावेश आहे. आता आणखीन एका मराठी व बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Actress Abhilasha Patil death news


काल दिनांक 4 मे 2021 रोजी अभिनेत्री अभिलाशा पाटील यांची दुःखद निधन झाले आहे. काही दिवसापूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता व त्यांच्यावर डोंबिवली येथील दवाखान्यात उपचार चालू होते. परंतु, काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याची वार्ता समोर आली. ही बातमी समजताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिल्याचे दिसून आले.

Actress Abhilasha Patil death news

 

अभिलाषा पाटील यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. तुझं माझं अरेंज मॅरेज, बायको देता का बायको हे अभिलाषा पाटील यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट होते. छिछोरे, मलाल, गुड न्यूज, बद्रीनाथ की दुल्हनिया या लोकप्रिय हिंदी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या होत्या.

Actress Abhilasha Patil death news
तू तिथे असावे, सोबत, पिप्सी या देखील मराठी चित्रपटात अभिलाषा यांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या. तसेच, त्या झी युवा वरील बाप माणूस या मालिकेत व काही जाहिरातीत देखील दिसून आल्या होत्या. कमी वयात या गुणवान अभिनेत्रीने निरोप घेतल्याने अभिनय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Actress Abhilasha Patil death news

सर्वांनी कमेंट मध्ये अभिलाषा यांना श्रद्धांजली व्हा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *