गेल्या चार दिवसांपासून भारतातील अनेक ठिकाणी तोक्ते चक्रीवादळाने थैमान घातले होते. तोक्ते वादळाचा जास्त फटका समुद्रकिनारी असलेल्या शहरांना जास्त झाला. त्यामध्ये मुंबई शहरातील अनेक ठिकाणी झाडे तुटून पडले, घराचे छप्पर उडून गेलेले पाहायला मिळाले. अशी संकटे उद्भवली असतानाच एक हिंदी टिव्ही अभिनेत्रीने लज्जास्पद कृत्य केले.

दिया और बाती हम मालिकेत संध्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका सिंग हीला नेटकऱ्यानी चांगलेच ट्रोल केले आहे. 2 दिवसापूर्वी मुंबईत तोक्ते वादळामुळे अनेक परिसरात झाडे मोडून रस्त्यावर पडली होती. दीपिकाच्या घराबाहेर देखील एक झाड मोडून पडले होते. तिने त्या मोडलेल्या झाडाजवळ जाऊन फोटोज् आणि व्हिडिओ शूट केले व ते सोशल मीडियावर पोस्ट केले.
एकीकडे चक्री वादळामुळे घराचे छप्पर उडाल्याने अनेकजण उघड्यावर आले आहेत. अनेकांचे आर्थिक नुकसान झाले व काहींना आपला जीव देखील गमवावा लागला. त्यातच दीपिकाने मनसोक्त नाचलेले व तिने मोडलेल्या झाडासोबत सेल्फी काढलेली पाहून अनेकांनी तिला कमेंट मध्येच सुनावले.
“तुझ्या घराचे छत व्यवस्थित आहे म्हणून नाचत आहेस”, “लोकं वादळामुळे मरत आहेत आणि तू आनंद घेत आहेस. किती लज्जास्पद आहे” अशा कमेंट्स करून नेटकऱ्यानी केलेल्या चुकीची जाणीव करून दिली. दीपिकाने यापूर्वी कवच, साथ निभाना साथिया मालिकेत देखील काम केले होते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.