महाराष्ट्रात सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने मालिका व चित्रपट शूटिंगला निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व शूटिंग या परराज्यात करण्यात येत असून झी मराठीची मालिका अग्गबाई सूनबाई मालिकेची शुटींग देखील गोव्यात करण्यात येत आहे. सध्या या मालिकेत एका नवीन अभिनेत्याचे आगमन होणार असून मालिकेला वेगळे वळण आले आहे.

Aggabai sasubai latest news


मालिकेचे नाव अग्गबाई सूनबाई झाल्यानंतर या मालिकेत सोहमची भूमिका अद्वैत दादरकर व शूभ्राची भूमिका उमा पेंढारकर हे साकारताना दिसून आले. तसेच, सुझ्यान पात्र असल्याने सोहम शुभ्राच्या नात्यात दुरावा येणार का असे वाटत होते. सध्या मालिकेत शुभ्रा सोहमच्या लग्नाचा वाढदिवस दाखविण्यात आहेत. त्यासाठी आसावरीने सोहम व शुभ्राला सरप्राईज दिले होते.

Aggabai sasubai latest news

सुझ्यानने आसावरीचा हा प्लॅन उलथून टाकत शुभ्रासमोर सोहमला प्रपोज केल्याचे दाखविण्यात आले. या सर्व गोष्टींमुळे शुभ्रा कसे व्यक्त होणार हे येणार काळ सांगेल. याच दरम्यान आता मालिकेत चिन्मय उदगीरकर या अभिनेत्याची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. चिन्मय उदगीरकरची एन्ट्री झालेला एक प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

चिन्मय उदगीरकर याने या अगोदर स्वप्नाच्या पलीकडले, नांदा सौख्यभरे, घाडगे अँड सून अशा अनेक मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, त्याने गुमाबजाम, मेकअप अशा काही चित्रपटात देखील काम केले आहे. आता अग्गबाई सूनबाई मालिकेत तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार असल्याचे समजते. त्यामुळे ही मालिका देखील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा दुसरा भाग तर असणार नाही ना, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

Aggabai sasubai latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *