आजपर्यंत अनेक लोकांनी भूत पाहिल्याचा दावा केलेला आपण ऐकलं आहे. परंतु, शास्त्रज्ञांनी अशा गोष्टींवर अभ्यास करून सर्व काही अफवा असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले. परंतु, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक विचित्र प्रकारची व्यक्ती दिसून आली आहे. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

Alien news in jharkhand


हा व्हिडिओ झारखंड येथील हजारीबाग जवळील एका डॅम पूल जवळील असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. काही व्यक्ती दुचाकीवरून त्या रस्त्यावरून जात असताना पांढरा रंग असलेली एक व्यक्ती रस्त्यावरून चालताना दिसून आली. व्हिडिओ शूट करताना काही लोक भूत आहे असे म्हणताना दिसले. काहींनी मुलगी आहे असे देखील म्हटले. या व्हिडिओ ने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे.

 

बघता बघता हा व्हिडिओ संपूर्ण देशभरात पसरला असून काहींनी तर याला एलियन असल्याचे म्हटले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी अशी व्यक्ती महिन्यापूर्वी देखील पाहिली असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असले तरी यामुळे कोणाचे नुकसान झाले नाही.

Alien news

बॉलिवूड निर्माती एकता कपूर ने देखील हाच व्हिडिओ शेयर केला असून “हा व्हिडिओ त्यांच्यासाठी भीतीदायक आहे जे एकटे झोपतात,” असे एकता ने कॅप्शन मध्ये म्हटले. एकता कपूर स्वतः अशाच भुताच्या चित्रपटासाठी लोकप्रिय आहे. या व्हिडिओचे आणि त्यातील दृश्याचे “मर्द मराठी” पुष्टिकरण करीत नाही. परंतु, या व्हिडिओ मुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *