अभिनयक्षेत्रात असे अनेक कुटुंबं पाहायला मिळतील, ज्यात एका पेक्षा जास्त सदस्य अभिनयाची रुची असलेली दिसून येतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते? मधील यशची सख्खी बहिण देखील अभिनय क्षेत्रात आहे. या मालिकेत अभिषेक देशमुख हा अभिनेता यशची भूमिका साकारताना दिसून येत आहे.

Amruta deshmukh actress biography


“पसंत आहे मुलगी” मालिकेतून लोकप्रियता मिळवणारा अभिषेक देशमुख हा अभिनेता सध्या यशची भूमिका उत्तमरीत्या साकारताना दिसून येत आहे. आईच्या शब्दापलीकडे न जाणारा मुलगा म्हणून यश मालिकेतून दिसून आला. प्रेक्षकांकडून अभिनयाची दाद मिळविणाऱ्या अभिषेकची खऱ्या आयुष्यातील बहिण अमृता देशमुख ही अभिनेत्री आहे.

 

भावाप्रमाणेच अमृता देखील अभिनयात परिपक्व आहे. “तुमचं आमचं सेम असतं” मालिकेतून फेमस झालेल्या अमृताने अस्मिता, पुढचं पाऊल, ब्रेकिंग व्ह्यूज अशा अनेक मालिकेत काम केले आहे. तसेच, फ्रेशर्स मालिकेतील तिची परीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अमृताचा स्वीटी सातारकर हा चित्रपट देखील येऊन गेला.

Deshmukh

अमृता ही सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव असते. सध्या तिच्या काही बोल्ड फोटोज सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय ठरत असतो. अभिषेक व अमृता यांचे वडील हे देखील एक थेटर आर्टिस्ट असल्याचे समजते. कदाचित त्यांच्यामुळेच हे दोन गुणी कलाकार अभिनय क्षेत्रात उतरले असतील. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *