सध्या देशभरात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवस बंद ठेवल्यानंतर आता परत एकदा लसीकरण सुरू झाले आहे. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लस घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ankita lokhande vaccination


अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर अंकिता लोखंडे ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. कधी सुशांत मुळे तर कधी तिच्या खाजगी आयुष्यामुळे अर्चना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. आता परत एकदा अंकिताचा लस घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने ती प्रकाशझोतात आली आहे.

 

अंकिता लोखंडेला इंजेक्शनची खूप भीती वाटत असल्याने ती लस घेताना देखील खूप घाबरली होती. अशा वेळी नर्स देखील तिची भीती कमी करण्यासाठी काही सूचना देत होती. अंकिता सोबत तिचे आई वडील होते व आईने तिला स्वामी समर्थांचा जप करायला सांगितला. त्याप्रमाणे अंकिता स्वामींचा जप करताना दिसून आली. नंतर लस घेतल्यास अंकिताने मोकळा श्वास घेतला.

Ankita lokhande vaccination

अंकिता ही देवी देवताना खूप मानते व त्यातच ती स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे. स्वतः लस घेऊन तिने दुसऱ्यांना देखील लस घेण्याचे आव्हान केले. लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता याचा दुसरा पार्ट सुरू होणार असून अंकिता हीच त्या मालिकेची मुख्य अभिनेत्री असल्याचे समजते. त्यामुळे ती परत एकदा छोट्या पडद्यावर लवकरच दिसण्याची शक्यता आहे.

Ankita lokhande vaccination

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.