मराठी मालिकांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या “आई कुठे काय करते?” या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेतील अरुंधतीचा मुलगा अभिषेकने अनघाला धोका देऊन अंकिता सोबत लग्न केलेले दाखविण्यात आले. अनघाची भूमिका साकारणाऱ्या अश्र्विनी महांगडे हिच्या खऱ्या आयुष्यात देखील एक दुःखद घटना घडली आहे.

Ashwini mahangade news


मूळची सातारा जिल्ह्यातील वाईची असलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे हीचा वडिलाचे परवा दिनांक 18 मे रोजी दुःखद निधन झाले आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाशी लढा देत असलेल्या प्रदिपकुमार महांगडे यांची मंगळवारी प्राणज्योत मावळली. आश्विनीसाठी तिचे बाबा खूपच प्रिय होते व यामुळे या घटनेचा अश्विनीला मोठा धक्का बसला आहे.

Ashwini mahangade news

स्वतः अश्विनीने एक पोस्ट करून फॅन्सना ही दुःखद बातमी सांगितली आहे. “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला. कधी स्वतःचे फाटलेले कपडे असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करीत राहिले व मलाही तेच शिकविले. काल जाता जाता एक सांगून गेले, समाजासाठी काही नाही केले तर आयुष्य निरर्थक” अशा दुःखद शब्दात अश्र्विनीने तिच्या नानांना श्रद्धांजली वाहिली.

अश्र्विनीचे वडील हे अत्यंत दिलदार स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते व ते नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असायचे. यामुळे त्यांच्या जाण्याने वाई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अश्र्विनी आई कुठे काय करते? मालिकेच्या टीम सोबत सिल्वासा येथे होती. ही दुःखद बातमी कळल्यास ती शूटिंग सोडून घरी आल्याचे समजते.

Ashwini mahangade news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका
By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *