सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेची चर्चा होताना दिसून येत आहे. मॉब लिंचिंकची घटना समोर आली असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहेत. या घटनेत एका मुलाला जीव गमवावा लागला असून काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.


ही घटना उत्तराखंड राज्यातील अल्मोडा जिल्यातील असून एका मुलीने तिचा प्रियकर भुवन चंद्र जोशी याला भेटावयास बोलविले. तो मुलगा 2 मित्रासोबत भेटायला गेला. ते दोघे जेंव्हा एकत्र भेटले तेंव्हा गावातील एकाने दोघांना एकत्र पाहिले. गावातील काही लोक व मुलीच्या घरचे जेंव्हा एकत्र जमले तेंव्हा मुलीला भुवन बद्दल विचारण्यात आले. त्यावेळी मुलीने जे उत्तर दिले ते भुवन साठी आचंबित करणारे होते.

स्वतःचे नाव खराब होवू नये म्हणून मुलीने घरच्यांना व गावातील लोकांना मी या मुलाला ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच, भुवन तिला त्रास देत असल्याचे देखील तिने सांगितले. तिचे बोलणे ऐकून गावातील लोकांनी भुवनला बेदम मारहाण केली. त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली नसल्याचे भुवन. सोबत गेलेल्या मित्रांनी सांगितले.गावकऱ्यांनी इतकी मारहाण केली त्यात भुवनला जीव सोडावा लागला.

संपूर्ण उत्तराखंड या प्रकरणामुळे हादरले असून सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. भुवनची चुकी नसताना देखील मुलीच्या चुकीमुळे विनाकारण त्याला जीव गमवावा लागला असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलीच्या सोबतच्या कॉल रेकॉर्डिंग देखील भुवन कडे असल्याचे नंतर उघडकीस आले. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून पुढील कारवाई चालू असल्याचे समजते.

Bhuwan news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *