एखाद्या व्हिडिओ मध्ये काही मनोरंजक असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. काही महिन्यांपूर्वी असाच एका व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक लहान बाळ केस कापून घेताना दिसून येत होता. त्या व्हिडिओत त्या बाळाचे बोलणे ऐकून अनेकांना हसू आवरले नव्हते.

Cute boy viral video


नागपूर येथील अनुप पेटकर यांचा लहान मुलगा अनुश्रुत याचाच तो व्हिडिओ होतात. हा व्हिडिओ नोव्हेंबर 2020 मध्ये इतका व्हायरल झाला की तो लाखो लोकांनी पाहिला होता. अनुश्रुतच्या न्हावी सोबतचे गोड संभाषणाने अनेकांना वेड लावले होते. स्वतः अनुप पेटकर यांनी आपल्या मुलाचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

 

त्या व्हिडिओ नंतर अनुश्रुतचे आणखीन काही व्हिडिओ समोर आले होते. आता तब्बल सहा महिन्यांत अनुश्रुतचा दाताच्या दवाखान्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये तो डेंटिस्ट सोबत गंमत करताना पाहायला मिळतोय. डॉक्टरच्या पोटाला हाथ लावून “आपका गोलू गोलू पेटू” असे म्हणताना दिसला.

अनुश्रुतच्या वडिलांनी हा व्हिडिओ 2 भागांमध्ये पोस्ट केला होता. परंतु, हा चिमुकला परत एकदा सोशल मीडियावर लोकप्रियता मिळविताना दिसून येत आहे. सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या दुःखद आणि संकटकाळी अनुश्रुतची ही व्हिडिओ अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या व्हिडीओला हजारो लोकांनी शेयर केलेले पाहायला मिळत आहे.माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *