झी मराठी वाहिनीचा टीआरपी गेल्या काही महिन्यांपूर्वी खाली घसरताना दिसून येत होता. परंतु, देवमाणूस, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांमुळे झी मराठीचा टीआरपी परत एकदा वाढला होता. परंतु, आता येणाऱ्या काही दिवसात झी मराठीची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे.

Devmanus serial end


काही मालिका काहीच महिने चालतात, परंतु या मालिका प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवितात. तुला पाहते रे, रात्रीस खेळ चाले अशा काही मालिकांनी ते सिद्ध करून दाखविले आहे. अशातच सध्या झी मराठीवर गाजत असलेली देवमाणूस ही मालिका देखील त्या पैकीच एक आहे. परंतु ही मालिका आता निरोप घेणार असल्याचे समजते.

Devmanus serial end

31 ऑगस्ट 2020 पासून सुरू झालेली देवमाणूस ही मालिका एका सत्यघटनेवर आधारित आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील वाई जवळील ढोम या गावातील होती. तीच घटना मालिकेच्या रूपातून दाखविण्यात आली आहे. मालिकेतील बोगस डॉक्टर अजितकुमार देव याने तब्बल 9 खून केल्याचे दाखविण्यात आले.

9 खून केलेल्या डॉक्टरच्या विरोधात जितके पण पुरावे पोलिसांना मिळाले ते सर्व अजितकुमार नष्ट करताना दिसला. त्याच्या वाटेत जो कोणी आला त्याला संपवून टाकला. या केसला सोडविण्यासाठी आलेल्या एसीपी दिव्या सिंगला देखील त्याने वेड्यात काढले होते. परंतु, आता लवकरच सत्य समोर येणार आहे.

गेल्या काही भागांमध्ये दिव्या सिंगला डॉक्टरच्या बोटाचे ठसे व चाकूचा पेन , असे काही पुरावे हाती लागलेे आहेत.  ज्यामुळे तिचा अजितकुमार वरील संशय आणखीनच बळावला. 31 मे रोजी अजितकुमार कोठडी मध्ये दिसणार असून या सर्व प्रकरणारचा खुलासा डिंपल करणार असल्याचे समजते. यामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते.

Devmanus

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *