झी मराठी वाहिनीवरील “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 2 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षकवर्ग भरभरून प्रेम देताना दिसून येत आहेत. सध्या तरी झी मराठीवरील ही मालिका जास्त लोकप्रिय असल्याचे दिसून येते.

Dipti kelkar latest news


“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका अन्विता फलटणकर ही साकारताना दिसून येत आहे. मालिकेत अन्विता ही स्वीटू हे पात्र साकारत असून तिला एक गरीब मध्यम वर्गीय घरातील मुलगी दाखविण्यात आली आहे. मालिकेचा मुख्य नायक ओम(शाल्व किंजवडेकर) आणि स्वीटूच्या मैत्रीला उत्तमरीत्या दाखविण्यात आले आहे.

Dipti kelkar latest news

मालिकेतील स्वीटू आणि नलू(दीप्ती केतकर) यांचा एक ऑफ स्क्रीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. पडद्यावर माय लेकी असणाऱ्या या दोघींनी “वन डान्स” या गाण्यावर डान्स केलेला एक व्हिडिओ बनविला आहे. अनेकांनी या व्हिडिओ बद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या दिसून आल्या.

 

अन्विता ही यापूर्वी आपल्याला टाईमपास या लोकप्रिय चित्रपटातून सर्वप्रथम दिसून आली होती. अन्विता व स्वीटू या दोघी अगोदरपासूनच उत्तम डान्सर आहेत. सध्या “येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेत ओम हा स्वीटूला मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर नात्यात होईल का, हे येणार काळच सांगेल.

Dipti kelkar latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *