सध्या मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत टॉप 5 मध्ये “मुलगी झाली हो” ही मालिका नेहमीच दिसून येत असते. स्टार प्रवाह वरील या मालिकेने टीआरपी मध्ये आघाडीला राहून नेहमीच सातत्य ठेवले आहे. ही मालिका टीआरपी मध्ये सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. कोरोनामुळे या मालिकेचे शूटिंग अद्याप बंद आहे.

Divya subhash latest video


“मुलगी झाली हो” ही मालिका यशस्वी होण्यामागे मालिकेची मुख्य नायिका माऊ म्हणजेच दिव्या सुभाष हीचा महत्त्वाचा वाटा आहे. दिव्या सुभाष हिला मालिकेत मुक्की दाखविण्यात आले आहे. माऊचे पात्र तिने उत्तमरीत्या साकारून त्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. सध्या दिव्याचा एक पडद्यामागचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

 

या व्हिडिओमध्ये मालिकेत शौनकची भूमिका साकारणारा योगेश सोहानी हा दिव्याचा मेकअप करताना दिसून येत आहे. योगेश याने मेकअप दादाला बाजूला काढून स्वतः दिव्याचा मेकअप करायला सुरुवात केलेला दिसून आला. अत्यंत प्रेमाने योगेश याने दिव्याचा मेकअप केला. काही दिवसांपूर्वी दिव्याने देखील योगेशचा मेकअप केला होता.

 

मालिकेचे भाग प्रसारित होणे थांबण्याअगोदर काही मोठ्या घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या. माऊ ही शौनकच्या प्रेमाला नकार देते व त्यामुळे या दोघांतील दुरावा वाढलेला दिसला. तसेच, दुसरीकडे सिद्धांत व माउच्या घरच्यांनी या दोघांच्या लग्नाला संमती दिल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे मालिका एका मनोरंजक वळणावर येऊन थांबली आहे.

Divya subhash latest video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *