Elephant rescue news

एखाद्या गरजूला मदत करणे, यापेक्षा मोठी समाजसेवा असू शकत नाही. सध्या कोरोना काळात अनेक ठिकाणी अनेकजण मदतीचा हात पुढे करून समाजसेवा करताना दिसून येत आहेत. मानवाकडून अनेकदा मुक्या प्राण्यांना देखील संकटातून वाचविताना पाहिलं आहे. सध्या एका हत्तीचा असाच एक समोर आला आहे.

Elephant rescue news


मागील काही महिन्यात आपण हत्ती बद्दल अनेक घटना घडलेल्या ऐकल्या आहेत. कुठे हत्तीच्या तोंडात फटाके फोडण्यात आले, कुठे हत्ती वर आगीचे लाकडे फेकलेल्या घटना घडल्या, कुठे वीज पडून काही हत्तीचे निधन झाल्याच्या घटना घडल्या. परंतु, सध्या एका हत्तीच्या पिल्लू बाबतीत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

Elephant rescue news

ही घटना कर्नाटकच्या कुर्ग जिल्ह्यातील असून तिथे एक हत्ती एका खड्डयात पडला होता. बरेच प्रयत्न करून देखील हत्तीला बाहेर यायला जमत नव्हते. नंतर तेथील इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) टीमने जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले. अखेर जेसीबीच्या सहाय्याने खड्डयात पडलेल्या हत्तीला बाहेर काढण्यात आयएफएस टीमला यश मिळाले.

खड्यात असताना हत्तीच्या डोळ्यात पाणी होते, असे स्थानिकांनी सांगितले. ज्यावेळी हत्तीला बाहेर काढण्यात आले त्यावेळी हत्तीने देखील आभार मानल्याचे दिसून आले. नंतर हत्तीला जंगलात वापस पाठविण्यासाठी फटाका फोडण्यात आला. देशभरात एकीकडे दुःखद घटना ऐकायला मिळत असतानाच दुसरीकडे या घटनेला पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर उमटले आहे.

Elephant rescue news

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *