सध्या देशभरात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवस बंद ठेवल्यानंतर आता परत एकदा लसीकरण सुरू झाले आहे. अशातच काही अभिनेत्री लस टोचून घेताना स्वतःच्या व्हिडिओ पोस्ट करताना दिसून येत आहेत.

Heena panchal trollलस टोचून घेताना आरती सिंग, अर्चना लोखंडे या अभिनेत्रींनी यापूर्वी फोटो व्हिडिओ पोस्ट केले होते. त्या पोस्ट्स मुळे दोघींना चांगलेच ट्रोल व्हावे लागले होते. आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात दिसून आलेली अभिनेत्री हिना पांचाळ हिला देखील याच कारणाने ट्रोलींगचा सामना करावा लागला आहे.

आपल्या आकर्षक अदांसाठी लोकप्रिय असणारी अभिनेत्री हिना पांचाळ हिने काल लस टोचून घेतली. लस टोचून घेतानाचा व्हिडिओ हिनाने पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ती इंजेक्शनला घाबरत असल्याचे दिसून आले. लस टोचल्यानंतर देखील हिना घाबरत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच काही वाईट कमेंटचा तिला सामना करावा लागला.

एका यूजर ने म्हटले, “50 रुपये ओव्हर ॲक्टिंगचे कट करा.” “इथे लोकांना लस मिळत नाही आणि हे लोग व्हिडिओ बनवीत आहेत”, असे एका यूजरने कमेंट केली. तर एकाने “तुम्ही इतके मोठे काम केला आहात, त्यासाठी तुम्हाला परमवीर चक्र घेऊन देतो,” अस म्हटले. अशा व्हिडिओज पोस्ट करण्याचा सोशल मीडियावर जणू ट्रेंडच चालू झाला आहे.

Heena panchal troll

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *