लोकप्रियतेच्या बाबतीत सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते? ही मालिका अग्रेसर दिसून येते. जवळपास दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेला जगभरातील मराठी प्रेक्षकांकडून प्रेम मिळत असते. या मालिकेतील सर्वच कलाकाराना या यशाचे श्रेय जाते. त्यामुळेच ही मालिका टीआरपी मध्ये देखील नेहमीच यश प्राप्त करताना दिसून येत असते.

Krutika deshmukh birthday

“आई कुठे काय करते?” मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या मालिकेत मधुराणी यांच्या मुलाचे पात्र साकारणाऱ्या अभिषेक देशमुख हा देखील उत्तम भूमिका साकारताना दिसून येत असतो. अभिषेकच्या घरी त्याच्या व्यतिरिक्त त्याची बहीण अमृता देशमुख व पत्नी कृतिका या देखील उत्तम कलाकार आहेत.

Krutika deshmukh birthday

अभिषेक व कृतीका हे दोघे 6 जानेवारी 2018 रोजी विवाह बंधनात अडकले होते. कृतीकाने हवाईजादा, पानीपत अशा काही हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, तिने राजवाडे अँड सन्स, हॅप्पी जर्नी अशा काही मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत. प्रथमेश परब सोबत “प्रेम हे” सीरिजच्या एका भागात देखील ती दिसून आली होती.

Krutika deshmukh birthday

अभिषेक देशमुख हा “आई कुठे काय करते” या मालिकेपूर्वी “पसंत आहे मुलगी” मधून दिसून आला होता. तसेच, त्याने काही हिंदी वेब सीरिज मध्ये देखील काम केले आहे. यश व कृतिकला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *