Marathi director death news

गेल्या काही महिन्यांपासून अभिनय क्षेत्राशी निगडित अनेक कलाकारांच्या निधनाच्या वार्ता ऐकावयास मिळाल्या. बॉलिवूड सहीत काही मराठी कलाकारांनी देखील जगाचा निरोप घेतला. चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अशा निधनाने अनेकांना धक्का बसला असतानाच आता मराठी चित्रपटसृष्टीला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे.

Marathi director death news


मराठी चित्रपट सृष्टीला मोलाचे योगदान देणारे लोकप्रिय दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे दुःखद निधन झाले आहे. काल सोमवारी म्हणजेच दिनांक 17 मे रोजी प्रणित यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. प्रणित यांच्या निधनाची वार्ता येताच अनेक मराठी कलाकारांना धक्का बसला असून त्यांनी प्रणित यांना श्रद्धांजली देखील वाहिली.

Marathi director death news

अभिनेता प्रवीण तरडे यांची पोस्ट वाचून तर अनेकजण भावूक झाले. “माझा प्रणित दादा गेला. गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी बद्दल लिहायला गेलो तर दिवस पुरायचा नाही. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरवला” अशा शब्दात प्रवीण तरडे यांनी प्रणित कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली. प्रवीण तरडे यांना यशस्वी करण्यात प्रणित यांचा मोठा हातभार होता.

मुळशी पॅटर्न, देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव अशा अनेक चित्रपटांचे प्रणित यांनी लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार होते. अरारा खतरनाक, गुरुचरिताचे कर पारायण, हंबीर तू खंबीर असे एका पेक्षा एक गाणी प्रणीत कुलकर्णी यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. त्यामुळे प्रणित यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.

Marathi director death news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.