चित्रपटात आपण नेहमीच दुसऱ्यांचा जीव वाचविणारे सुपर हिरो पाहिले आहेत. त्या सुपरहिरोना अनेकजण आदर्श मानताना दिसून येतात. आपल्याला खऱ्या आयुष्यात देखील असेच सुपर हिरो दिसून येत असतात. असाच एक सुपरहिरो वांगणी रेल्वे स्टेशनवर मयूर शेळकेच्या रुपात संपूर्ण जगाला पाहायला मिळाला.

Mayur shelake news


काही दिवसांपूर्वी म्हणजेच 17 एप्रिल 2021 रोजी वांगणी स्टेशनवर एक अंध महिला तिच्या लहान मुलाला घेऊन प्लॅटफॉर्म वरून चालत होती. मुलगा डोळे झाकून चालू लागल्याने तो अचानक रेल्वे ट्रॅकवर खाली पडला. त्याच वेळी कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणारी उद्यान एक्स्प्रेस समोर येत होती. त्याच वेळी पॉईंटमॅन मयूर शेळके हा देवदूतासारखे त्या मुलाच्या मदतीला आला.

Mayur shelake news

मयूर शेळके याने स्वतःच्या जीवाची परवा न करता अवघ्या 7 सेकंदात धावत जाऊन त्या लहान मुलाचा जीव वाचविले. बघता बघता मयूर शेळके हा देशाचा हिरो झाला व त्याला अनेक क्षेत्रातील लोकांनी मदत केल्याचे दिसून आले. परंतु, आता या व्हिडिओचा दुसरा भाग समोर आला असून मयूर कसा धावत आला व त्या रेल्वेच्या ड्रायव्हर ने दाखविलेली तत्परता या व्हिडिओ मधून दिसून येत आहे.

 

काही दिवसांपूर्वी त्या रेल्वेच्या चालकाने देखील रेल्वेची स्पीड कमी केली असल्याची बातमी ऐकायला मिळाली. या नवीन व्हिडिओ मध्ये देखील चालकाने एक्स्प्रेस रेल्वेची स्पीड काहीशी कमी केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चालकाचे देखील कौतुक करण्यात येत आहे. तसेच, मयूर शेळके हा किती जास्त वेगाने धावून येत असल्याचे देखील दिसून येत आहे. मयूर व त्या रेल्वे चालकाला “मर्द मराठी”चा सलाम.

Mayur shelake news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *