4 जानेवारी 2021 रोजी झी मराठी वाहिनीवर “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सुरू झाली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळविले आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. आज मालिकेतील महत्वाचा भाग असलेल्या “मोमो” बद्दल जाणून घेऊयात.

Meera jagannath actress pic


“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत मोमोची भूमिका मीरा जगन्नाथ या अभिनेत्रीने साकारली आहे. मीराच्या मालिकेतील आगमनानंतर मालिकेत धमाल विनोद पाहायला मिळाले. मालिकेत मीरा एका श्रीमंत घरातील मुलीची भूमिका साकारताना दिसत असून ती मालविकाची जवळची मैत्रीण असते.

Meera jagannath hot pic

ओम आणि स्वीटू या दोघांच्या प्रेमात मोमोचा अडथळा ठरणार की काय असे सुरुवातीपासून वाटत होते. कारण, ओमची बहिण मालविका हिला ओमचे लग्न मोमो सोबतच लावून द्यायचे असते. त्यामुळे ओमला स्वीटू पासून दूर करण्यासाठी मीरा व मालविका या दोघी अनेकदा प्रयत्न करताना दिसून आल्या. मालिकेत मीरा मॉडर्न लुक मध्ये दिसून आली असली तरी ती खऱ्या आयुष्यात त्यापेक्षा बोल्ड फोटोज मुळे चर्चेत असते.

 

मीरा जगन्नाथच्या फोटोज् व अभिनय पाहता येणाऱ्या काळात एक टॉपची मॉडेल देखील होवू शकते. मीरा यापूर्वी आपल्याला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत संजना नावाचे छोटेसे पात्र साकारताना दिसून आली होती. तसेच, तिने ईलूईलू या चित्रपटात देखील काम केले आहे. आज तिचा वाढदिवस असून तिच्यावर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. मीराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Meera jagannath hot pic

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *