सध्या महाराष्ट्र व गोवा राज्यात तर कोरोना मुळे परिस्तिथी खूप गंभीर होत चालली आहे. याच कारणाने सर्व चित्रपट व मालिकांच्या शूटिंगला महाराष्ट्र व गोव्यात परवानगी देण्यात आली नाही. याच कारणाने झी मराठीवरील “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेचे शूटिंग सिल्वासा येते करण्यात येत आहे.

Mother s day celebration


“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेची सर्व टीम bio-bubble चे पालन करीत सिल्वासा येथे थांबले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे सर्व कलाकार बराच काळ घरापासून दूर राहिले आहेत. काल जागतिक मातृदिन असल्याने सर्वजण कदाचित कुटुंबीयांची आठवण करीत होते. अशातच, सेटवर एक भावनिक पत्र आले व सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

मालिकेत शकूचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या अभिनेत्री सखी गोखले हीने ते पत्र पाठविले होते. “अम्मा, अदिती, दीप्ती, शुभांगी तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी थँक्स. आमचे चांगले जीवन जावे म्हणून घरापासून दूर राहून काम करताय त्यासाठी थँक्यू” असे सखीने पत्रात लिहिले.

Mother s day celebration

हे पत्र वाचून मालिकेच्या सर्व महिलांना आश्रु आवरता आले नाहीत. सखीने मालिकेच्या प्रोडक्शन टीमच्या मदतीने केक देखील पाठविला होता. सर्वांनी तो केक कापला. शुभांगी गोखले यांनी या प्रसंगाची माहिती देताना एक भावनिक पोस्ट केली. सखीला या पाठविलेल्या प्रेमासाठी तिचे आभार मानले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *