आज पर्यंत आपण असे अनेक अपघात पहिली असतील जे डोळ्याला विश्वास न बसण्यासारखे असतात. काही अपघात कॅमेऱ्यात कैद झाले नसते कोणालाही विश्वास बसत नसतो, असे असतात. सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून ज्यात एक मुलगा स्वतःच्या चुकीने ऑटोमधून खाली पडला.

Pune auto accident viral


ही घटना शनिवार दिनांक 15 मार्च 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे घडली. एक मुलगा रिक्षा चालवीत आला आणि अचानक रस्त्याच्या दुभाजकाला धडकला. तो इतक्या जोरात धडकला की ऑटो तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला व ऑटोवाला दुभाजका जवळ जोरात आपटला. परंतु, हा अचानक असा कसा पडला हाच प्रश्न तिथे उपस्थित लोकांना पडला.

Pune auto accident viral

स्थानिक पोलिसांना देखील हा अपघात नक्की कसा झाला हा प्रश्न पडला असताना तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्या व्हिडिओत रिक्षाचालक चालत्या ऑटोमधून रोडवरील कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करीत होता. याच कारणाने त्याचा तोल गेला व ऑटो दुभाजकारून दुसऱ्या बाजूस गेला. इतके जोरात आपटून देखील रिक्षाचालकाला जास्त जखम झाली नाही.

 

ज्यावेळी रिक्षा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेला, त्यावेळी सुदैवाने कोणतीही वाहने येत नव्हती. तेथील दोघांनी प्रसंगावधान दाखवून रिक्षाचा वेग कमी करून वेळेवर थांबविले. या अपघातातून एक गोष्ट मात्र शिकण्यासारखी आहे की जो दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्याच्या कर्माची फळे नक्की मिळतात. असेच काहीतरी त्या रिक्षाचालकासोबत घडले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *