एखाद्या कलाकाराने साकारलेल्या पात्रावरून त्याच्या खऱ्या आयुष्यातील राहणीमान तसेच नसू शकते. मालिकेत अत्यंत साध्या रुपात दिसणारे काही कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र खूपच स्टायलिश दिसत असतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे लागिर झालं जी मालिकेत जयडीचे पात्र साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे ही होय.

Purva shinde dance video


लागिर झालं जी मालिकेत मध्यंतरी पहिल्या जयडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री किरण धाने हीने मालिका सोडली होती. त्यामुळे हे पात्र अभिनेत्री पूर्वा शिंदे हीने साकारले. अगोदर चेहऱ्यावरील हावभावामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या पूर्वा ने जयडीचे पात्र उत्तमरित्या साकारले होते.

Purva shinde dance video

मालिकेत ग्रामीण भागातील साडी मधील लुक मध्ये दिसून आलेली पूर्वा खऱ्या जीवनात खूपच वेगळी आहे. सोशल मीडिया वर तीचे एकापेक्षा एक बोल्ड फोटोज् पाहायला मिळत असतात. तिच्या याच फोटोंमुळे ती युवा पिढीचे आकर्षण ठरत असते. सध्या पूर्वाचा एक डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.

पुर्वाचा Cardi B – Up या ट्रेंडींग गाण्यावरील वरील व्हिडिओ पाहून अनेकांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी तिने झी युवा वरील “युवा डान्सिंग क्वीन” या शो मध्ये तिच्या डान्सचे जलवे दाखविले आहेत. तो शो अपूर्ण राहिला नसता तर कदाचित त्या शो ची विजेती पूर्वा हीच राहिली असती. मराठीतील या नवोदित अभिनेत्रीच्या कलागुणांना पाहून तीचे भविष्य उज्वल असणार हे नक्की.आज पूर्वाचा वाढदिवस असून “मर्द मराठी” तर्फे तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *