स्टार प्रवाह वाहिनीवरील काही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहेत. यामध्ये फुलाला सुगंध मातीचा ही मालिकेने सुरुवातीपासूनच अनेकांची मने जिंकली. या मालिकेतील मुख्य पात्र शुभम कीर्ती यांच्यामुळेच मालिकेला जास्त प्रसिद्धी मिळाली.

Samruddhi Kelkar dance video


फुलाला सुगंध मातीचा मालिकेत शुभमचे पात्र हर्षद अतकरी व कीर्तीचे पात्र समृध्दी केळकर हे साकारत आहेत. आयपीएस होण्याचे स्वप्न बाळगणारी कीर्तीचे लग्न आचारी शुभम सोबत झाले. मनाच्या विरुद्ध लग्न झाले असले तरी दोघांचे प्रेम आता हळू हळू फुलताना दिसून येत आहे. सध्या मालिकेतील कीर्तीचे काही डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहेत.

 

सध्या ट्रेंडिंग असलेल्या “रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना” या गाण्यावर समृध्दीने चक्क जीन्स वर नाचताना दिसून आली. मालिकेत नेहमीच साडीवर दिसणारी समृद्धीला जीन्स वर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अभिनया सोबतच समृध्दी एक उत्तम डान्सर असल्याचे दिसून येत आहे. तिने Cardi B – Up या गाण्यावर देखील डान्स केला आहे.

 

 

समृध्दी खूप अगोदर पासूनच एक उत्तम डान्सर असून तिने यापूर्वीही काही डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. सध्या सध्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेत शुभम कीर्तीच्या नात्यातील दुरावा कमी होत असून यापुढे दोघांचे प्रेमळ क्षण पाहायला मिळणार आहेत. ही मालिका टिआरपी मध्ये बरेच काळ 1 नंबरला होती व ती सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Samruddhi

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *