महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे सर्व चित्रपट व मालिकांचे शूटिंग राज्याबाहेर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे अनेक कलाकारांना आपल्या कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. याच कारणाने अभिनेता शशांक केतकर देखील त्याच्या पत्नीला मिस करीत असल्याचे दिसून येत आहे.

Shashank ketkar singing song

झी मराठी वाहिनीवरील “पाहिले न मी तुला” या मालिकेचे शुटींग सध्या सिल्वासा येथे सुरू आहे. यापूर्वी या मालिकेची शूटिंग गोव्यात सुरू होती. परंतु, गोवा सरकार ने देखील शूटिंग वर बंदी घातल्याने मालिकेला सिल्वासा येथे हलविण्यात आले. या मालिकेतील अभिनेता शशांक केतकर हा गेली बरेच दिवस कुटुंबासोबत नसल्याने तो आता त्याच्या पत्नीला मिस करीत असल्याचे दिसून येत आहे.

शशांक ने स्वतः एक पोस्ट करून पत्नी प्रियंका केतकर हीची आठवण येत असल्याचे सांगितले. “मी आत्ता प्रियंका जवळ नाहीये. तिच्यापासून खूप दूर शूटिंग करीत आहे. मी तिला किती मिस करतोय हे सांगायला या गाण्याचे शब्द पुरेसे आहेत. प्रियंका आय लव्ह यू” अशा शब्दात शशांकने प्रियंकावरील प्रेम व्यक्त केले. तसेच, त्याने “सोच ना सके” हे गाणे प्रियंका साठी गायले.यावर प्रियंकाने “रडवलास शशा” अशी कमेंट करून उत्तर दिले.

 

शशांक व प्रियंका यांचे लग्न 4 डिसेंबर 2017 रोजी झाले होते. या दोघांना 21 फेब्रुवारी 2021 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाली होते. त्यानंतर शशांक खूप कमी वेळा बाळाला व पत्नीला भेटला आहे. सध्या “पाहिले न मी तुला” मालिकेत मनू व अनिकेत यांनी लग्नाची कबूली दिल्याने मोठा गोंधळ उडालेला दिसून येत आहे. त्यामुळेच, समर देखील संतापलेला दिसून येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *