Shweta shinde viral video

काही महिन्यांपूर्वी म्हणजेच 30 नोव्हेंबर 2020 रोजी एका लग्नातील नवरीचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्या दिवशी संकेत शिंदे यांचे लग्न श्वेता ताजणे या मुलीसोबत झाले होते. त्या लग्नात श्वेताने पती संकेत साठी डान्स करीत लग्न मंडपात एन्ट्री केली होती. त्या व्हिडिओमुळे श्वेता रातोरात लोकप्रिय झाली होती.

Shweta shinde viral video


मुलीने लग्नात नाचलेले पाहण्याची आणखीन पण काही लोकांची मानसिकता नसते. परंतु, श्वेताने स्वतः नवरी असताना केलेल्या डान्सचे अनेकांनी कौतुक केले होते. “मेरे सैय्या सुपरस्टार” या गाण्यावर श्वेताने केलेला डान्स व्हिडिओ काही दिवसातच लाखो लोकांनी पाहिला होता. यापूर्वी नवऱ्याने नवरीसाठी डान्स केलेले अनेक व्हिडिओ पाहिले होते. परंतु, नवरीने नवऱ्यासाठी केलेला हा डान्स व्हिडिओ क्वचितच कोणी पाहिला होता.

आता श्वेता परत एकदा सोशल मीडियावर फेमस झाली असून तिचा आणखीन एक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. सध्या सर्वत्र “पुण्याची मैना” या गाण्याचा ट्रेंड चालू असून श्वेताने याच गाण्यावर केलेल्या डान्स व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. तिने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला तब्बल 50 लाख लोकांनी पाहिले आहे.

मूळची जुन्नर येथील असलेल्या श्वेताने स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिचा नवरा संकेत हा पेशाने इंजिनियर असून एका कंपनीत जॉब करतो. अनेकांनी श्वेताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, माझी सासू व माझे पती मला डान्स साठी सपोर्ट करतात असल्याचे स्वतः श्वेता सांगत असते. संकेत व श्वेता यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *