मराठी चित्रपट सृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींनी गेल्या काही महिन्यांपासून लग्न बंधनात अडकल्याचे दिसून आले. यामध्ये नेहा पेंडसे, मिताली मयेकर, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर अशा काही अभिनेत्रींचा समावेश होता. आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने अचानक लग्न करून फॅन्सना सुखद धक्का दिला आहे.

Sonali kulkarni marriage news


सोनाली कुलकर्णीने अगदीच मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत कुणाल बेनोदकर या व्यक्तीसोबत लग्नाची गाठ बांधली आहे. दोघांचे लग्न 7 मे रोजी पार पडले असून सोनालीने आज तिच्या वाढदिवशी याचा खुलासा केला आहे. सोनाली कुलकर्णीने गेल्या वर्षी 2 फेब्रुवारीला साखरपुडा केला खरे, पण त्यावेळी देखील तिने वाढदिवशीच त्याबद्दल उघड केले होते.

Sonali kulkarni marriage news

“अब से हम ‘7 मे’. खरे तर आम्ही जुलै मध्ये UK येथे लग्न करणार होतो. परंतु, UK ने मध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने व तेथील सरकारने भारतीयांसाठी प्रवास बंद केल्याने आम्ही लवकर लग्न करून सुखद धक्का देण्याचा निर्णय घेतला. मी शूटिंग संपल्यास मार्च मध्ये दुबईला गेले व लग्न बंधनात अडकले. माझे आई बाबा भारतात, कुनालचे लंडनला असल्याने फक्त 15 मिनिटात 4 लोकांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न उरकून टाकले”, असे सोनालीने पोस्ट करून सांगितले.

Sonali kulkarni marriage news

“समारंभासाठी होणारा खर्च कमी करून तो कोणाला मदत करता येईल यापेक्षा मोठे भाग्य नाही. सर्व ठीक झाल्यानंतर परत एकदा उत्साहात लग्न करू,” असे देखील सोनालीने पुढे म्हटले. सोनालीचा पती कुणाल हा पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असून तो दुबईमध्ये जॉब करतो. कुणाल व सोनालीला वैवाहिक आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *