स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या मालिकेने आजपर्यंत घवघवीत यश मिळविले आहे. 17 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपी मध्ये नेहमीच चांगले यश मिळविले आहे. सर्वोत्तम मराठी मालिकांमध्ये बरेच दिवस एक नंबरला असणारी ही मालिका सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Sukh mhanje nakki kay asat latest


मालिकेतील गौरी व जयदीप या जोडीला देखील खूपच लोकप्रियता मिळालेली दिसून आली. या दोघांचे प्रेम व उत्तम अभिनय यामुळेच “सुख म्हणजे नक्की काय असतं”? या मालिकेला यश मिळू शकले. तसेच, मालिकेत माईची भूमिका साकारणारी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा देखील मालिकेच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे.

Sukh mhanje nakki kay asat latest

या मालिकेत गेले काही दिवस जयदीप गौरीला मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत नेण्यासाठी तयार करीत होता. यासाठी त्याने तिला इंग्रजी बोलायला शिकविले, पार्टीत गेल्यास सर्वांसमोर कसे हावभाव द्यायचे हे देखील शिकविले. गौरीचा इंग्रजी बोलतानाचा एक व्हिडिओ सध्या सर्वांना पोट धरून हसायला लावीत आहे.

 

पार्टी दिवशी जयदीप गौरीच्या अगोदर पार्टी मध्ये पोहचतो. परंतु, शालिनी व देवकी या दोघी गौरीला पार्टी मध्ये जाऊ न देण्यासाठी प्लॅन करतात. नेहमी प्रमाणे त्यांचा हा प्लॅन देखील फसतो व गौरी पार्टीत वेळेवर पोहचते. नेहमीच साडीवर दिसणाऱ्या गौरीचा मॉडर्न लुक पाहून प्रेक्षकवर्ग चकित झाला आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *