अभिनय क्षेत्रात काम करताना प्रत्येक कलाकार आपली छाप पाडताना दिसून येत असतात. प्रेक्षकांच्या मनात आपली ओळख व्हावी असा प्रयत्न कलाकार करताना दिसून येतात. “पुणे टाईम्स ऑनलाईन”ने अशाच काही अभिनेत्रींची नावे घोषित केली आहेत, ज्या टिव्ही मधून प्रेक्षकांचे आकर्षण ठरल्या आहेत.

Top 15 desirable actress


टॉप 15 अभिनेत्रींच्या या यादीत तुला पाहते रे व चला हवा येऊ द्या फेम गायत्री दातार हीने 15वे स्थान मिळविले आहे. जीव झाला येडापिसा मालिकेतील सिद्धी म्हणजेच विदुला चौघुले हिला या यादीत 14 वे स्थान मिळाले आहे. तुला पाहते रे व रात्रीस खेळ चाले-3 फेम पौर्णिमा डे हीने या यादीत 13 वे स्थान मिळविले आहे. तर अभिनेत्री ईशा केसकर हिला 12 वे स्थान मिळाले आहे.

Top 15 desirable actress

11व्या क्रमांकावर लागीर झालं जी व युवा डान्सिंग क्वीन फेम अभिनेत्री पूर्वा शिंदे हीचा नंबर लागला. या यादीत अभिनेत्री रुपाली भोसले- आई कुठे काय करते(10वा), अभिनेत्री गौतमी देशपांडे-माझा होशील ना?(9वा), पूजा बिरारी – स्वाभिमान शोध अस्तित्वाचा (8वा), तन्वी मुंडले – पाहिले न मी तुला (7वा), रसिका सुनील – माझ्या नवऱ्याची बायको (6वा) या अभिनेत्रींचा नंबर लागतो.

Top 15 desirable actress

5व्या क्रमाकांवर गणपती बाप्पा मोरया मालिकेतील नयना मुके ही अभिनेत्री आहे. येऊ कशी तशी मालिकेतील मोमो म्हणजेच मीरा जगन्नाथ हीने या यादीत 4 था नंबर मिळविला आहे. तसेच, देवमाणूस मालिकेत दिव्या सिंगचे पात्र साकारणाऱ्या नेहा खान हीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. दुसऱ्या क्रमांकावर क्लासमेट चित्रपटाची अभिनेत्री पल्लवी पाटील हीचा नंबर लागतो.

Top 15 desirable actress maharashtra

महाराष्ट्रातील आकर्षक महिलांच्या यादीत पहिला क्रमांक पटकाविण्याचा मान लोकप्रिय अभिनेत्री “तेजश्री प्रधान”ने मिळविला आहे. अग्गबाई सासूबाई मालिकेतील तिच्या शुभ्रा या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हा किताब माझ्यासाठी प्रेरणादायी असून यातून नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळेल, असे तेजश्रीने मुलाखतीत म्हटले आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *