झी मराठी वाहिनीवरील जास्त काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजेच “तुझ्यात जीव रंगला” ही होय. राणा अंजली प्रमाणेच या मालिकेतील खलनायिका नंदिता प्रेक्षकांना खूपच आवडली. मालिकेच्या शेवटी धनश्री काडगावकरची जागा घेणाऱ्या माधुरी पवारला देखील फॅन्सनी तितकीच पसंती दिली होती.

Tuzyat jiv tangata dance


माधुरी पवार या अभिनेत्रीचा जन्म 21 मार्च, 1993 रोजी झाला होता. माधुरीचे शालेय शिक्षण साताऱ्यातच पूर्ण झाले व नंतर तिने महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले. तिने एमबीएची पदवी देखील घेतली आहे. अगोदर पासूनच अभिनय व डान्सची आवड असलेल्या माधुरीला टिकटॉकमुळे अधिक लोकप्रियता मिळाली होती.

Tuzyat jiv tangata dance

सोशल मीडियावर माधुरी सारखे ॲक्टिव क्वचितच एखादी अभिनेत्री राहत असेल. तिचे अनेक डान्स व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या डान्स व्हिडिओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. सध्या माधुरीचा “तुझे देखते ही ट्रॅफिक रुक जाये” यावरील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अशाच डान्स मुळे माधुरीच्या फॅन्स मध्ये कमालीची वाढ झाली आहे व टिकटॉक सारखेच ती आता इंस्टाग्रामवर देखील लोकप्रिय होत आहे. याच कारणाने माधुरी सध्या अनेक इव्हेंटसाठी अनेकांची पसंती ठरत आहे. माधुरीने या अगोदरही टेलिव्हिजन वर झी युवा वरील अप्सरा आली या डान्स शो डान्सचे जलवे दाखवून विजेती झाली होती.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *