भारतासमोर दिवसेंदिवस एका पाठोपाठ एक संकटे उभे राहताना दिसून येत आहेत. कोरोना रुग्णाची वाढती संख्या, लसीचा तुटवडा, ऑक्सिजन बेडचा तुटवडा, ऑक्सिजन गळती अशा समस्या चालू असतानाच आता उत्तराखंड मधून एक ढगफुटी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परत एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Uttarakhand news

ही घटना उत्तराखंड राज्यातील देवप्रयाग मध्ये मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यावेळी ढगफुटीसदृश पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला. या प्रवाहामुळे अनेक इमारती, घरं तसेच दुकानांचे मोठं नुकसान झाले आह. या घटनेचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.

 

या व्हिडिओ मध्ये उत्तराखंडमधील नगरपालिकेचे भवन व आयटीआयची इमारत काही सेकंदातच ढासाळली असल्याचे दिसून येत आहे. यावरून पाण्याचा प्रवाह किती जोरात होता हे दिसून येते. हा परिसर एक व्यापारी परिसर असून उत्तराखंड मध्ये लॉकडाऊन असल्याने नशिबाने तिथे कसलीच वर्दळ नव्हती.

सुदैवाने देव प्रयाग मधील या घटनेत कसलीही जीवितहानी झालेली नाही. अचानक ढगफुटी झाल्याने गडेरा या नदीची पाणी पातळी वाढल्याने ही घटना घडली. एसडीआरएफ ची टीम तिथे दाखल झाली असून मदतकार्य सुरू झाल्याचे स्थानिक पोलीस अधिकारी महिपाल सिंह रावत यांनी म्हटले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *