गेल्या काही महिन्यांपासून मराठी कलाकारांच्या लग्नाच्या व साखरपुड्याच्या बातम्या ऐकावयास मिळत आहेत. कोरोना काळात देखील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अनेक मराठी अभिनेते व अभिनेत्रींनी लग्न बंधनात अडकल्याचे दिसून आले. आता यामध्ये आणखीन एका कलाकार जोडीनी बर घातली आहे. अभिनेता विजय आंदळकर व अभिनेत्री रुपाली झनकर यांचा साखरपुडा पार पडला.

Vijay alandkar marriage news


झी मराठी वर येऊन गेलेल्या “लग्नाची वाईफ वेडींगची बायको” या मालिकेत नवरा बायकोच्या भूमिकेत दिसून आलेल्या विजय आंदळकर व पुजा झनकर यांचा 22 एप्रिल रोजी साखरपुडा पार पडला. त्या मालिकेत दोघांनी मदन आणि काजल हे पात्र साकारले होते. स्वतः रुपाली हीने पोस्ट करून फॅन्स सोबत हि आनंदाची बातमी शेयर केली.

या पोस्ट वर अनेकजण शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत असून त्यांच्यावर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेच्या दरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असावे. विजय याने मालिकेसोबतच मिस्टर अँड मिसेस सदाचारी, ढोल ताशे, 702 दिक्षित या चित्रपटात उत्तम भूमिका साकारताना दिसून आला आहे.

Vijay alandkar marriage news

विजय आळंदकर याचे हे दुसरे लग्न असून त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव पूजा पुरंदरे आहे. या दोघांचा विवाह 2017 मध्ये झाला होता. परंतु, त्यांचे नातेसंबंध जास्त काळ टिकू शकले नव्हते. पूजा सध्या “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेत मिस नाशिक (कामिनी) हे महत्त्वाचे पात्र साकारताना दिसून येत आहे. विजय व रुपाली यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Vijay alandkar marriage news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *