झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली अग्गबाई सुनबाई ही मालिका नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. अग्गबाई सासूबाई मालिकेचा दुसरा भाग म्हणून सुरू झालेल्या या मालिकेत काही नवीन कलाकार दिसून आले. परंतु, अग्गबाई सुनबाई मालिकेतील कलाकारांना सुरुवातीपासूनच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
नव्याने सुरू झालेल्या मालिकेत अद्वेत दादरकर(सोहम), उमा पेंढारकर(शुभ्रा), गीतांजली गाणगे(सुझ्यान) हे नवीन कलाकार दिसून येत आहेत. परंतु, सोशल मीडियावर या सर्व कलाकारांना वाईट शब्दात ट्रोल व्हावे लागते. सुझ्यानचे पात्र साकारणारी अभिनेत्री गीतांजली गाणगे ने अशा ट्रोलर्स बोचक्या शब्दात फटकारले आहे. इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये गीतांजलीने आपले मत व्यक्त केले.
“हे जे नकारात्मक कमेंट करतात, तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात निराश आहात का? की तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसत नाहीत? दुसऱ्यांना नावे ठेवणे यात तुमचा मोठेपणा दिसत नाही, तर तुम्ही किती लुझर्स आहात हे दिसून येते. माझ्या आयुष्याचा तर मंत्र आहे की तुमच्या आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी तुम्ही सकारात्मक गोष्टीकडेच पाहिले पाहिजे” असे गीतांजली म्हणाली.
“तुम्ही छान राहा, तुम्हाला आपोआप छान वाटेल. कोणीही कोणाच्या लुक बद्दल काही बोलू नये. लुक हे देवाची देणगी असते. त्यात आपण बदल करू शकत नाही. त्यातच खुश रहा.” अशा शब्दात गीतांजलीने नेटकऱ्याना समज दिला. सध्या अग्गबाई सुनबाई मालिकेत सुझ्यान सोहमच्या आयुष्यात येऊन शुभ्राला सोहमपासून दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.