14 जून 2020 रोजी बॉलिवूडला हादरवून सोडणारी एक घटना घडली होती. लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे निधन झाल्याची वार्ता आली आणि संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत होते. आज सुशांत सिंग राजपूत याचा प्रथम स्मृतिदिन असून सोशल मीडियावर सर्वत्र त्याला अभिवादन करण्यात येत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हीने देखील सुशांतला अभिवादन केले आहे.

Ankita lokhande on sushant death
सुशांतची पूर्व गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे हीला सुशांतच्या निधनाच्या घटनेतून सावरायला खूप वेळ लागला. सुशांतच्या निधनाचे तिला इतका जास्त धक्का बसला होता की तिने तब्बल महिनाभर स्वतःला व्यक्त केली नव्हती. परंतु त्यानंतर तिने तिच्या मनातील सर्व दुःख व्यक्त केले. आज सुशांतच्या स्मृतिदिनी अंकिताने काही जुन्या आठवणी व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणल्या आहेत.

Ankita lokhande on sushant death

अंकिताने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ मध्ये सुशांत व अंकिता यांचे बरेच जुने व्हिडिओ एकत्र केलेले आहेत. या व्हिडिओ मध्ये सुशांत व अंकिता आरती करीत आहेत, गाडी वर फिरताना दिसत आहेत, गप्पा मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक फॅन्स ना दुःख आवरता आले नाही. “माझ्या प्रवासात सोबती राहण्यासाठी धन्यवाद सुशांत.” अशा शब्दात अंकिताने सुशांतला अभिवादन केले.

तसेच, अंकिताने आणखीन एक व्हिडिओ पोस्ट केला असून ज्यात तो अंकितासोबत डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ 2011 च्या दिवाळी मधील असून तिने या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांत नेहमीच सकारात्मक राहायचा. त्यामुळेच त्याने आत्मह’त्या केली हे ऐकून अनेकांना अजूनही विश्वास बसत नाही. सुशांतला प्रथम स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *