सोशल मीडियावर आपण अनेकदा लग्नात डान्स केलेले व्हिडिओ पाहिले असतील. सध्याच्या मॉडर्न जगात नवरा नवरी नाचलेले आपण अनेकदा पाहिले आहे. परंतु, नवरा नवरी साठी एखाद्या नातेवाईकाने स्पेशल डान्स करणे ही थोडी कुतूहलाची गोष्ट वाटते. आता एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात तिने दीराच्या लग्नात सुंदर डान्स केला आहे.

Anuradha dance viral video
अनुराधा दिघे खेडूलकर नामक एका महिलेचा एक डान्स व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. अनुराधा यांचे दिर अमोल खेडूलकर यांचा काही दिवसांपूर्वी विवाह संपन्न झाला. या लग्नात अनुराधा यांनी “लो चली मै अपने देवर की बारात लेके” या गाण्यावर सुंदर डान्स केला व त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट देखील केला.

अनुराधा या एक डान्सर असून त्यांनी हा डान्स अचानक केला व त्यांनी तो उत्तमरीत्या पदर्शित केला. वहिनी ही दुसरी आईच समजले जाते व वहिनीची माया देखील आई सारखीच असते याचाच प्रत्यय अनुराधा यांनी त्यांच्या दिरासाठी या डान्स मधून दिला. लोक काय म्हणतील याचा विचार न करता अनुराधा मनसोक्त नाचल्या व त्याबद्दल त्यांचे अनेकजण कौतुक करताना दिसून येत आहेत.

Anuradha dance viral video
29 वर्षीय अनुराधा यांचा विवाह 7 वर्षापूर्वी झाला होता व त्यांना अगोदरपासूनच डान्सची खूप आवड होती. तुम्ही जर काही स्पेशल केले तर सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यास वेळ लागत नाही. मूळच्या नागपूरच्या असलेल्या अनुराधा बाबतीत देखील असेच काहीतरी झाले तुम्हालाही अनुराधा यांचा डान्स कसा वाटला ते कमेंट करून कळवायला विसरू नका.

Anu

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *