Ashwini mahangade news

काही दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच तिचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले होते. तिच्या वडिलांच्या निधनाने अश्विनी व तिच्या कुटुंबावर कधीही न भरून काढता येणारी पोकळी निर्माण झाली होती.


18 मे 2021 रोजी अश्र्विनीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर स्वतः तिने आधारवड हरपला असल्याचे म्हटले होते. ती तिच्या वडिलांना नाना या नावाने हाक मारायची. आता अश्विनी व तिच्या कुटुंबाने परत एकदा जीवनाच्या या लढाईला परत एकदा जोमाने लढण्याचा निर्णय घेतला आहे. नानांचे शेतीवर खूप प्रेम असल्याने तोच वारसा अश्विनी व तिचे कुटुंब पुढे नेताना दिसून येत आहेत.

Ashwini mahangade news

 

अश्विनीने एक फोटो इंस्टाग्राम स्टोरी मध्ये पोस्ट करताना असे लिहिले, “जगणं सोडता येत नाही, लढणं थांबवता येत नाही. आज हळद लावली. नानांचे हळदी वर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. त्यातलीच ही एक गोष्ट(कापसाची शेती) लव्ह यू नाना.” अशा शब्दात अश्विनीने तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वतः अश्विनी शेतीमध्ये मदत करताना दिसून येत आहे.

Ashwini mahangade news

सध्या अश्विनी “आई कुठे काय करते?” या मालिकेत अनघा हे मुख्य पात्र साकारताना दिसून येत होती. परंतु, वडिलांच्या निधनाने तिला शूटिंग सोडून वापस वाईला जावे लागले होते. तिचे वडील ज्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते, त्या दवाखान्यावर तिने गंभीर आरोप लावले होते. आता परत एकदा अश्विनी दुःख मागे सारून संसाराला परत एकदा रुळावर आणून एक आदर्श निर्माण करीत आहे.

Ashwini mahangade news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *