सत्यघटनेवर आधारित असलेली झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिका जरी सत्य घटनेवर आधारित असली तरी या मालिकेत काही थोडेफार बदल दाखविण्यात आले आहेत. या मालिकेत बोगस डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे.

Dev manus aarya deshmukh news

आता देवमाणूस या मालिकेत एका नवीन पात्राचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे. देवी सिंगच्या विरोधात सरकारी वकील म्हणून आर्या देशमुख हे पात्र मालिकेत नव्याने आलेले दिसून येत आहे. अभिनेत्री सोनाली पाटील ही त्या आर्या नावाचे पात्र साकारत आहे. सोनालीने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील “वैजु नंबर 1” मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

Dev manus aarya deshmukh news

सध्या सोनालीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. “दिल है तुम्हारा” चित्रपटाच्या शीर्षक गीतावर सोनालीने बनविलेला व्हिडिओ युवा पिढीचे आकर्षण ठरत आहे. यापूर्वीही सोनालीने अनेक व्हिडिओ बनविले असून प्रत्येक व्हिडिओमधून ती तिच्या अदांनी अनेकांना घायाळ करून सोडले आहे.

 

स्टार प्रवाह वाहिनीवरील “वैजू नंबर 1” या मालिकेत सोनालीने वैजू हे मुख्य पात्र साकारले होते. या मालिकेने नंतर डिसेंबर 2020 या मालिकेतील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाल्यानेच तिला परत एकदा छोट्या पडद्यावर संधी मिळाली. सध्या देवमाणूस मालिकेत देवी सिंग वर भारी पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे देवी सिंग चक्क हिच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *