सत्यघटनेवर आधारित असलेली झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिका जरी सत्य घटनेवर आधारित असली तरी या मालिकेत अनेक बदल दाखविण्यात आले आहेत. या मालिकेत बोगस डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

आता देवमाणूस या मालिकेत एका नवीन पात्राचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे. देवी सिंगच्या विरोधात सरकारी वकील म्हणून आर्या देशमुख हे पात्र नव्याने दिसून येत आहे. अभिनेत्री सोनाली पाटील ही त्या वकिलाची भूमिका साकारत असून तिने यापूर्वी कलर्स स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.
9 मार्च 2020 रोजी स्टार प्रवाह वाहिनीवर “वैजू नंबर 1” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत वैजू हे मुख्य पात्र सोनाली पाटील हिनेच साकारले होते. या मालिकेने नंतर डिसेंबर 2020 रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. परंतु, सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. त्यामुळेच तिला परत एकदा छोट्या पडद्यावर संधी मिळाली.
सोनाली पाटील या अभिनेत्रीचा जन्म लातूर येथे झाला असून ती मूळची कोल्हापूर येथील आहे. कोल्हापूर येथेच ती लहानाची मोठी झाली. एक टिकटॉक स्टार म्हणून लोकप्रिय असलेली सोनाली पाटील आता अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करताना दिसून येत आहे. तिचा अभिनय पाहता ती भविष्यात नक्कीच स्वतःचे नाव कमवेल हे नक्की.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.