Dev manus serial news latest

सत्यघटनेवर आधारित असलेली झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिका जरी सत्य घटनेवर आधारित जणू असली तरी या मालिकेत काही थोडेफार बदल दाखविण्यात आले आहेत. या मालिकेत बोगस डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे.

Dev manus serial news latest

देवमाणूस मालिकेतील अन्य कलाकारांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर आपापली छाप पाडली आहे. आज्जी, टोण्या, दिव्या सिंग, डिंपल अशी काही पात्र प्रेक्षकांना आवडू लागली. परंतु आता मालिकेच्या फॅन्स साठी दुःखद बातमी असून यापैकी एक कलाकार मालिकेतून निरोप घेणार असल्याचे समजते. मालिकेत उत्तम ट्विस्ट चालू असतानाच एखाद्या कलाकाराने मालिका सोडणे हे फॅन्ससाठी वाईट गोष्ट असते.

Dev manus serial news latest

मालिकेच्या उत्तरार्धात पदार्पण केलेली अभिनेत्री नेहा खान ही मालिका सोडणार असल्याचे समजते. नेहा खान हीने मालिकेत एसीपी दिव्या सिंग हे पात्र साकारले आहे. मालिकेत दिव्याने डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग याला अखेर जाळ्यात अडकविण्यात यश मिळविले आहे. परंतु, दिव्याचे पात्र येणाऱ्या काही भागात संपणार असल्याचे समजते.

Dev manus serial news latest

देवमाणूस मालिकेतून दिव्या सिंग जाणार की नाही हे येणाऱ्या काही भागातच प्रेक्षकांना समजेल. दिव्या नंतर एक पुरुष इन्स्पेक्टर आल्याचे पाहायला मिळणार आहे. गेल्या काही एपिसोड्स मध्ये सरकारी वकील आर्या देशमुखचे आगमन झाल्याने सध्या मालिकेत तिचीच जास्त चर्चा चालू आहे.

Dev manus serial news latest

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *