तुझ्यात जीव रंगला मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही गेल्या काही महिन्यांपासून तिच्या बाळाला घेऊन जास्त चर्चेत असते. धनश्री काडगावकर हिला 28 जानेवारी 2021 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले होते. तेव्हापासून धनश्री ने बाळांचे फोटो व नाव आजपर्यंत प्रेक्षकांपासून लपवून ठेवले होते. परंतु, आता दोन्ही गोष्टींचा उलगडा फॅन्स समोर झाला आहे.

 

धनश्री काडगावकर व तिचा पती दूर्वेश देशमुख या दोघांनी त्यांच्या बाळासोबत धमाल केलेल्या व्हिडिओ पोस्ट केल्या. परंतु, बाळाचा चेहरा त्यांनी दाखविला नव्हता. आज दिनांक 27 जून रोजी धनश्रीने तिच्या बाळाचे बारसे केले असून तिने याच निमित्ताने तिच्या बाळाचा चेहरा फॅन्सना दाखविला आहे. बाळासोबत धनश्री व दूर्वेश दोघेही असल्याचे दिसून येत आहे .

Dhanashri kadgaonkar latest news

काही दिवसांपूर्वी धनश्रीचे पती दुर्वेश यांनी बाळाचा चेहरा वेळ आल्यास दाखविण्यात येईल असे म्हटले होते. दोघांचे नावाची सुरुवात व त्यांचे आडनाव देशमुख हे “D” अक्षरापासून असल्याने दोघे मुलाचे नाव देखील D पासून ठेवतील अशी शक्यता होती. परंतु, या दोघांनी बाळाचे नाव “कबीर” ठेवले आहे. कबीर हा आता 5 महिन्याचा झाला असून तो खूपच गोड दिसत आहे.

Dhanashri kadgaonkar latest news

धनश्री ने स्वतः पोस्ट करून बाळाचे बारसे झाले असल्याची माहिती फॅन्सना दिली. या पोस्ट वर अनेक मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षया देवधर, सुयश टिळक, गायत्री दातार, ऋतुजा बागवे, मृणाल दूसानीस यांनी धनश्री व तिच्या बाळाला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या धनश्री तिच्या फिटनेसकडे लक्ष देत असून ती लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *