समाजात प्रबोधन करणारे अनेक साधू संत आपल्या देशात आपण पाहिले आहेत. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम हे साधुसंत करीत असताना दिसतात. परंतु, स्वतःला साधू म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीचा पत्नीला मार’हाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

Gajanan chikankar news


गावागावात जाऊन कीर्तनाचे धडे देणारा गजानन चिकनकर हा महाराज कल्याण तालुक्यातील द्वारली गावात राहतो. त्याच्या सोबत 2 पत्नी, मुले, सुना, नातवंड असे सर्वजण राहत असतात. परंतु, त्याच्या नातवाने असा एक व्हिडिओ शेयर केला ज्यामुळे गजानन चिकनकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. व्हिडिओ मध्ये हा महाराज एका वयोवृद्ध महिलेला मार’हाण करताना दिसून येत आहे.

गजानन चिकनकर या निर्दयी माणसाने त्या वृद्ध महिलेला हाताने, बादलीने बेदम मार’हाण केल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ मधील महिला ही त्याची पहिली पत्नी असून घरातील कामे करीत नाही म्हणून तो तिला रोज मार’हाण करीत असल्याचे समजते. बादलीने मार’हाण केल्याने तिच्या हाताच्या बांगड्या फुटून रक्त निघाल्याचे दिसून येत आहे.

Gajanan chikankar news

 

“ह. ब. प . गजानन बुवा चिकनकर ( द्वारली ) समाजाला उपदेश करतो. चातुर्मास करतो व पंढरीत राहतो. परंतु, घरी पत्नीला मार’हाण करतो. याचा निषेध करून याला संप्रदाया बाहेर काढलं पाहिजे” असा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत. पोलिसांना या व्हिडिओची माहिती मिळताच घराकडे धाव घेतली असता, तो भोंदू बुवा अगोदरच आळंदीला पळून गेला होता.

ही पोस्ट जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *