स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या मालिकेने आजपर्यंत घवघवीत यश मिळविले आहे. 17 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपी मध्ये नेहमीच चांगले यश मिळविले आहे. सर्वोत्तम मराठी मालिकांमध्ये बरेच दिवस एक नंबरला असणारी ही मालिका सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मालिकेतील गौरी व जयदीप या जोडीला देखील खूपच लोकप्रियता मिळालेली दिसून आली. या दोघांचे प्रेम व उत्तम अभिनय यामुळेच “सुख म्हणजे नक्की काय असतं”? या मालिकेला यश मिळू शकले. आज आपण मालिकेत जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधव याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी बद्दल जाणून घेऊयात.
मंदार जाधव या अभिनेत्याची खरी पत्नी देखील एक अभिनेत्री असून दोघांचे लव्ह मॅरेज असल्याचे समजते. मंदारच्या खऱ्या पत्नीचे नाव मितिका शर्मा असून ती खूपच सुंदर व बोल्ड दिसते. मितीका हीने देवों के देव : महादेव या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारलेली दिसून आली. त्याच वेळी मंदार देखील अलादीन या मालिकेत काम करीत होता.
मंदार व मितीका हे दोघे 22 एप्रिल 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते. या दोघांना आता 2 मुले असून दोघांची नावे रिदान आणि रेहान अशी आहेत. मितीका ही सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते व ती तिच्या बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून येत असते. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.