झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याला अनेक कलाकारांकडून शुभेच्छाचा होताना दिसून आला. देवमाणूस मालिकेत रेश्माचा नवरा विजयची भूमिका साकारणारा अभिनेता एकनाथ गीते याने किरणला स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्याने किरणचे भरभरून कौतुक केले आहे.

Kiran Gaikwad birthday special

एकनाथ गीते किरणसाठी शुभेच्छा दिलेल्या पोस्टमध्ये म्हणाला, “इंडस्ट्रीचा कुठलेही बॅकग्राऊंड नसताना एक साधा मुलगा झी मराठीचा देवमाणूस होऊ शकतो. फक्त हिरो व विलन होऊन तो थांबत नाही तर झी चे तीन तीन अवॉर्ड्स घेतो मी त्याच्या या यशाबद्दल त्याला काही विचारलं तर तो म्हणतो, ‘ही तर सुरुवात आहे आपले अजून खूप खूप काही करायचंय एक्का.’ सगळं पॉझिटिव्ह बोलणं कसं असतं याचं.”

Kiran Gaikwad birthday special

“ह्याला अगदी कुठल्याही परिस्थितीला इतकं शांत कसं राहता येतं? आणि गोष्टी कशा ignore करता येतात? इतक्या प्रसिद्धीनंतर देखील इतकं साधं कसं राहता येते? असे अनेक प्रश्न मला पडतात. मला आणि माझ्यासारख्या खेड्यापाड्यातून चिखला मातीतून येणाऱ्या असंख्य कलाकारांना तुझ्यामुळे स्वप्न बघायला बळ मिळतं. मागच्या वर्षभरात खूप काही शिकलो आहे तुझ्याकडून. वाढदिवसाच्या भावा तुला परभणी पासून पुण्यापर्यंत शुभेच्छा. मोठा हो वगैरे असं नाही म्हणणार कारण पुढच्या दोन-तीन वर्षात तू तिथे जाऊन पोहोचलेला असशील” अशा सुंदर शब्दात एकनाथने किरणला शुभेच्छा दिल्या.

 

खरोखरच किरण गायकवाड याचे आत्तापर्यंतचे करियर पाहता तो अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. महिंद्रा कंपनीत नोकरी करणारा किरण आता अभिनय क्षेत्रात यशस्वीरीत्या वाटचाल करताना दिसून येत आहे. लागीर झालं जी मधील भैय्यासाहेब असो वा देव माणूस मधील डॉक्टर असो किरण ने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. “मर्द मराठी” तर्फे किरणला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Kiran Gaikwad birthday special

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *