सध्या देशभरात सर्वत्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आगमनाचे संकेत मिळत असल्याने कोरोनाची लस घेण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याने काहींना लस भेटत नसल्याचे दिसून आले. त्यातच काही सेलेब्रिटी लस घेतानाच्या फोटोज् व्हिडिओ टाकल्याने ट्रोल होताना दिसतात. अशातच अभिनेत्री मलायका अरोरा चा लस घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Malayka arora troll on dress

47 वर्षीय मलायका अरोरा हीने काल लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनाची दुसरी लस टोचून घेतली. त्यावेळी मलायका ही काळ्या रंगाचे जॉगर्स व जॅकेट परिधान करून लसीकरण केंद्रावर पोहचली. याच कपड्यावरून मलायकाला चांगलेच ट्रोल व्हावे लागले आहे. अनेकांनी या व्हिडिओला पाहून अंगप्रदर्शन करण्याची गरज काय? असा सवाल केला आहे.

 

काही नेटकऱ्यानी मलायकाला अशा कमेंट्स केल्या. “जीमला गेली होती की लस घ्यायला”, “हिला कुठे कसले कपडे घालावे, याचे भान नसते”, “प्रत्येकवेळी अंगप्रदर्शन करणे गरजेचे असते का?”, “तुम्ही सिनियर सिटिझन आहात म्हणून तुम्हाला दुसरा डोस मिळाला”, “इथे पण ब्रा वर गेली, लाज नावाची गोष्टच नाही” अशा शब्दात नेटकऱ्यानी ट्रोल केले.

लस घेतल्यानंतर मलायका अरोरा ने पोस्ट करताना फॅन्सना लस घेण्याचे आवाहन केले आहे. “जसे मी नेहमी म्हणते की मी केवळ स्वतःसाठीच नाही तर ते तुमच्यासाठी सुद्धा सुरक्षित राहणार आहे. तिथल्या प्रत्येक कोरो’ना योद्धाबद्दल माझे असलेले कृतज्ञता मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. सर्वांचे आभार!” असे म्हणत मलायका ने सर्व कोरोना योद्धांचे आभार मानले आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *