गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकार विवाह बंधनात अडकल्याचे दिसून आले. त्यामध्ये ग्लॅमरस मराठी अभिनेत्री मानसी नाईक हीने जानेवारी 2021 मध्ये लग्न केले होते. तेंव्हा पासून मानसी सोशल मीडियावर अधिकच चर्चेचा विषय ठरत आली आहे. सोशल मीडियावर ती ॲक्टिव असल्याने लग्नानंतर ती नेहमीच काही ना काही पोस्ट करताना दिसून आली.

Mansi naik latest news

आज वटपौर्णिमा असल्याने मानसी नाईक पहिल्यांदाच लग्नानंतर हा सण साजरा करणार आहे. त्यामुळे मराठमोळ्या लुक मधील तिने तिचे काही फोटोज् व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट करीत मानसीने कॅपशन मध्ये उखाणा घेतला. “वडाची पूजा करते ठेवुनी निर्मळ मन, प्रदीप रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण” असा सुंदर उखाणा मानसीने घेतला.

 

हिरव्या रंगाची काठ पदराची साडी व काही दागिने घातल्याने मानसी खूपच सुंदर दिसून येत होती. तसेच, तिने काही फोटोज् पोस्ट करीत आणखीन एक उखाणा घेतला आहे. “झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास, प्रदीप रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास” असा उखाणा घेत मानसीने समाजाला झाडे लावण्याचा संदेश दिला आहे. परराज्यातील मुलासोबत लग्न केले असले तरी मानसी लग्नानंतर सर्व महाराष्ट्रीयन सण साजरा करताना दिसून येते.

मानसीचा ज्या व्यक्ती सोबत लग्न झाले त्याचे नाव प्रदीप खरेरा आहे. प्रदीप हा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून तो भारताचे प्रतिनिधित्व करतो. हे दोघे लग्नापूर्वी अनेक महिने एकमेकांच्या प्रेमात होते. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 19 जानेवारी 2021 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. दोघांमध्ये किती जास्त प्रेम आहे हे सोशल मीडियावर नेहमीच फॅन्सला पाहायला मिळत असते.

Mansi naik latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *