झी मराठी वाहिनीवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका खूपच गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपापली वेगळीच ओळख केली होती. परंतु, आता या मालिकेच्या फॅन्स साठी दुःखद बातमी समोर आली असून मालिकेत गाजलेल्या एका अभिनेत्याचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.

 

 

“स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेत खाशाबा हे पात्र साकारणारा कलाकार उज्ज्वल धनगर याचे काल 28 जून 2021 रोजी सकाळी 6 वाजता निधन झाले. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे राहणाऱ्या उज्ज्वल याने शनिवारी क्राईम पेट्रोलची शूटिंग संपून घरी आला. रविवारी त्याने नगरसेवक संतोष तरे सोबत जेवण केले. परंतु, सोमवारी पहाटे त्याला छातीत त्रास होवू लागला होता.

Marathi actor ujjwal dhangar death news
ॲसिडीटी असेल म्हणून त्याने रुग्णालयात जाऊन औषध घेऊन आला. नंतर परत त्याला छातीत दुखू लागल्याने तो परत दवाखान्यात दाखल झाला व उपचारादरम्यान त्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. टिटवाळा येथील स्मशानभूमीत त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. उज्ज्वलच्या जाण्याने एक अभिनय क्षेत्रातील उत्तम कलाकार हरवला आहे.

वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निधन झालेल्या उज्ज्वलच्या मित्र परिवाराला या घटनेने मोठे दुःख झाले आहे. त्यांचे कमी वयातच जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. उज्ज्वल ने स्वराज्यजननी जिजामाता, लक्ष्य, क्राईम पेट्रोल अशा काही हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केले होते. उज्ज्वलला मर्द मराठी टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Marathi actor ujjwal dhangar death news

सर्वांनी कमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली द्या व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *