स्टार प्रवाह वाहिनीवरील “आई कुठे काय करते” ही लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेत आजपर्यंत अनेक मोठी ट्विस्ट पाहायला मिळाली. त्यातच काही दिवसांपूर्वी अभीने अचानक अनघाला सोडून अंकिताशी केलेला विवाह प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरला. आता याच मालिकेतील एक अभिनेत्री हिंदी मालिकेत दिसून येणार आहे.

Marathi actress in new hindi serial


आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची नवीन सून झालेली अंकिता म्हणजेच राधा सागर ही अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार आहे. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर राधा आता स्टार प्लस वरील “ये रिश्ता क्या कहलता है” या लोकप्रिय मालिकेत दिसून येणार आहे. राधाने काही महिन्यांपूर्वी “एक महानायक डॉ. बी आर आंबेडकर” या हिंदी मालिकेत देखील उत्तम भूमिका साकारली होती.

Marathi actress in new hindi
हिंदी मालिकांमध्ये सर्वोत्तम मालिकांमध्ये “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेचे नाव घेतले जाते. त्यामुळे त्या मालिकेत अभिनायची संधी मिळणे ही राधासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल. राधा जरी हिंदी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला असली तरी ती “आई कुठे काय करते?” या मालिकेत देखील पुढे कायम दिसून येणार आहे.

Marathi actress in new hindi
राधा सगर हीने यापूर्वी मलाल, ठाकरे या काही हिंदी सिनेमात छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच विकून टाक, एक अलबेला, मंकी बात, कंडीशन अप्लाय अशा काही मराठी चित्रपटात देखील झळकली होती. सोशल मीडियावर आपल्या सुंदर व मोहक फोटोमुळे युवा पिढीचे आकर्षण ठरणाऱ्या या अभिनेत्रीला आता नव्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याने तिच्या फॅन्स मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Marathi actress in new hindi

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *